भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे तों स्वभाव मज अनावर । तुज ही देतां भार कांहीं नव्हे

majhe ton svabhav maj anavar | tuj hi detan bhar kanhin navhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझे तों स्वभाव मज अनावर । तुज ही देतां भार कांहीं नव्हे ॥१॥ ऐसें कळों आलें मज नारायणा । जागृती स्वपना ताळ नाहीं ॥ध्रु.॥ संपादितों तो अवघा बाह्य रंग । तुझा नाहीं संग अभ्यंतरीं ॥२॥ तुका म्हणे सत्या नाहीं पाठी पोट । असतें निघोंट एकी जाती ॥३॥