भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे तों फुकाचे काय वेचे कष्ट । नव्हे क्रियानष्ट तुम्हांऐसा

majhe ton phukache kay veche kashta | navhe kriyanashta tumhanaisa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझे तों फुकाचे काय वेचे कष्ट । नव्हे क्रियानष्ट तुम्हांऐसा ॥१॥ कांहीं च न वंचीं आजिच्या प्रसंगीं । सकळा ही अंगीं करीन पूजा ॥ध्रु.॥ द्यावें तुम्हीं काहीं हें तों नाहीं आस । असों या उदास देहभावें ॥२॥ तुका म्हणे माझी मावळली खंती । समाधान चित्तीं सर्वकाळ ॥३॥