भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा देव्हारा साचा । नाहीं आणीक कोणाचा । त्रिभुवनीं याचा । ठसा न लगे पुसावें

majha devhara sacha | nahin anik konacha | tribhuvanin yacha | thasa na lage pusaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझा देव्हारा साचा । नाहीं आणीक कोणाचा । त्रिभुवनीं याचा । ठसा न लगे पुसावें ॥१॥ या रे लोटांगणीं । कांहीं करा विनवणी । करील झाडणी । भूत काढी संसार ॥ध्रु.॥ पडिले विषयांचे गोंधळीं । ते त्रिगुण आकळी । हरीनाम आरोळी । कानीं पडतां ते उठी ॥२॥ घेतला अहंकारें । काम क्रोध या मत्सरें । पळती प्रेमभरें । अवघे ठाव सांडुनी ॥३॥ घेतलासे पुरा । माया ममता आसरा । अवघ्या एक सरा । पळती रंग देखोनी ॥४॥ तुका म्हणे द्यावा भाव । फिटेल मनिचा संदेह । आणीक न लगे ठाव । कांहीं कोठें हिंडावें ॥५॥