भजनी मालिका
← भजनांकडे परत

मजसवें नको चेष्टा । नव्हे साळी कांहीं कोष्टा

majasaven nako cheshta | navhe sali kanhin koshta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मजसवें नको चेष्टा । नव्हे साळी कांहीं कोष्टा ॥१॥ बैस सांडोनि दिमाख । जाय काळें करीं मुख ॥ध्रु.॥ येथें न सरे चार । हीण आणीक वेव्हार ॥२॥ तुका विष्णुदास । रस जाणतो नीरस ॥३॥