भजनी मालिका
← भजनांकडे परत

मजपुढें नाहीं आणीक बोलता । ऐसें कांहीं चित्ता वाटतसें

majapudhen nahin anik bolata | aisen kanhin chitta vatatasen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मजपुढें नाहीं आणीक बोलता । ऐसें कांहीं चित्ता वाटतसें ॥१॥ याचा कांहीं तुह्मीं देखावा परिहार । सर्वज्ञ उदार पांडुरंगा ॥ध्रु.॥ काम क्रोध नाहीं सांडिलें आसन । राहिले वसोन देहामध्यें ॥२॥ तुका म्हणे आतां जालों उतराई । कळों यावें पायीं निरोपिलें ॥३॥