भजनी मालिका
← भजनांकडे परत

मजमाजी पांहतां मीपण हारपलें

majamaji panhatan mipan harapalen

मजमाजी पांहतां मीपण हारपलें । ठकलेंचि ठेलें सये मन माझें ॥१॥ आंत विठ्ठलु बाहेर विठ्ठलु । मीचि विठ्ठलु मज भासतसे ॥२॥ मीपण माझें नुरेचि कांहीं दुजें । ऐसें नाहीं केलें निवृत्तिराजें म्हणे ज्ञानदेवो ॥३॥