भजनी मालिका
← भजनांकडे परत

मजचि कां करणें लागला विचार । परी वर्म साचार न कळे कांही

majachi kan karanen lagala vichar | pari varma sachar na kale kanhi

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
मजचि कां करणें लागला विचार । परी वर्म साचार न कळे कांही ॥१॥ कैशी करुं सेवा आणिक ते भक्ति । न कळे विरक्ति मज कांही ॥२॥ आणिक तो दुजा नाहीं अधिकार । कैसा हा विचार करूं आतां ॥३॥ चोखा म्हणे बहु होती आठवण । कठिण कठिण पुढें दिसे ॥४॥