भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज तुरंबा कां वो जिये तिये

maj turamba kan vo jiye tiye

मज तुरंबा कां वो जिये तिये । जेणें वेधें हरि सोयरा होये । मज लावा कां वो चंदन ऐसिये परीचे । जे लाविलियाचि अनादि पुसोनि जाये वो ॥१॥ मज करा कां वो कांहीं एक । जेणें करणें ठाके अशेख । सरा कांवो मज आडुनि मज पाहों द्या । आपुले मुखगे माये ॥२॥ मज श्रृंगारा कां वो तया जोगी । पुढती अंग न समाय अंगी । या मना पासोनी पढिये तो गोंवळु । तोचि तो जिव्हारीं भोगीनगे माये ॥३॥ देह पालटा वो तयासाठीं । वरच या देईन अवघी सृष्टी । बापरखुमादेवीवरा विठ्ठलास योगी । तोचि तो त्यागुन भोगीये माये ॥३॥