भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज तों नवल वाटतसें जीवीं । आपुली पदवी विसरले

maj ton naval vatatasen jivin | apuli padavi visarale

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
मज तों नवल वाटतसें जीवीं । आपुली पदवी विसरले ॥१॥ कवणिया सुखा परब्रह्म भुललें । गुंतोनी राहिलें भक्त भाके ॥२॥ निर्गुण होतें तें सगुण पैं झालें । विसरोनी गेलें आपआपणा ॥३॥ चोखा म्हणे कैसा हा नवलाव । देवाधिदेव वेडावला ॥४॥