भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज अंगाच्या अनुभवें । काई वाईट बरें ठावें

maj angachya anubhaven | kai vait baren thaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मज अंगाच्या अनुभवें । काई वाईट बरें ठावें ॥१॥ जालों दोहींचा देखणा । नये मागें पुढें ही मना ॥ध्रु.॥ वोस वसती ठावी । परि हे चाली दुःख पावी ॥२॥ तुका म्हणे घेऊं देवा । सवें करूनि बोळावा ॥३॥