भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज ऐसें कोण उद्धरिलें सांगा । ब्रीदें पांडुरंगा बोलतसां

maj aisen kon uddharilen sanga | briden panduranga bolatasan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मज ऐसें कोण उद्धरिलें सांगा । ब्रीदें पांडुरंगा बोलतसां ॥१॥ हातींच्या कांकणां कायसा आरिसा । उरलों मी जैसा तैसा आहें ॥ध्रु.॥ धनमंत्री हरी रोग्याचिये वेथे । तें तों कांहीं येथें न देखिजे ॥२॥ तुका म्हणे नाहीं अनुभव अंगें । वचन वाउगें कोण मानी ॥३॥