भजनी मालिका
← भजनांकडे परत

माहेरींचें आलें तें मज माहेर । सुखाचें उत्तर करिन त्यासी

maherinchen alen ten maj maher | sukhachen uttar karin tyasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माहेरींचें आलें तें मज माहेर । सुखाचें उत्तर करिन त्यासी ॥१॥ पायांवरी माथा आळीगीन बाहीं । घेइऩन लवलाहीं पायवणी ॥ध्रु.॥ सुख समाचार पुसेन सकळ । कैसा पर्वकाळ आहे त्यास ॥२॥ आपुले जीवींचें सुखदुःख भावें । सांगेन अघवें आहे तैसें ॥३॥ तुका म्हणे वीट नेघें आवडीचा । बोलिली च वाचा बोलवीन ॥४॥