भजनी मालिका
← भजनांकडे परत

महा तेजा आंत बिंदू कोणे परी

maha teja ant bindu kone pari

महा तेजा आंत बिंदू कोणे परी । उष्ण तेजा माझारीं साक्ष पाहा ॥१॥ कुंडलनी उर्ध्वमुखें अग्नी सोडी । तयाची हे जोडी संत जना ॥२॥ ज्ञानेश्वर म्हणे आत्मयातें जाणे । सुनिळ अनुभवणें निवृत्ती पाहा ॥३॥