भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागुता हाचि जन्म पावसी । भोगिलें सुखदुःख जाणसी। हें तों न घडे रे सायासीं । कां रे अंध होसी जाणोनियां

maguta hachi janma pavasi | bhogilen sukhaduhkh janasi| hen ton na ghade re sayasin | kan re andh hosi janoniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मागुता हाचि जन्म पावसी । भोगिलें सुखदुःख जाणसी। हें तों न घडे रे सायासीं । कां रे अंध होसी जाणोनियां ॥१॥ लक्ष चौ†याशी न चुके फेरा । गर्भवासीं यातना थोरा । येउनि पडसी संदेहपुरा। वोळसा थोरा मायाजाळीं ॥२॥ पशु काय पापपुण्य जाणती । उत्तम मध्यम भोग भोगिती । कांहीं एक उपजतां मरती । बहिरीं अंध होती पांगुळ मुकीं ॥३॥ नरदेह निधान लागलें हातीं । उत्तम सार उत्तम गती । होइन देव चि म्हणती ते होती । तरि कां चित्तीं न धरावें ॥४॥ क्षण एक मन स्थिर करूनी । साव होई डोळे उघडोनी । पाहें वेद बोलिले पुराणीं । तुका विनवणी करीतसे ॥५॥