भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागितल्यास पसरी कर । पळतां भरी वाखती

magitalyas pasari kar | palatan bhari vakhati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मागितल्यास पसरी कर । पळतां भरी वाखती ॥१॥ काय आम्ही नेणों वर्म । केला श्रम नेणतां ॥ध्रु.॥ बोलतां बरें येतां रागा । कठीण लागा मागेंमागें ॥२॥ तुका म्हणे येथें बोली । असे चाली उफराटी ॥३॥