भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागील विसर होईंल सकळ । केली तळमळ दुःखाची ते

magil visar hoinl sakal | keli talamal duhkhachi te

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मागील विसर होईंल सकळ । केली तळमळ दुःखाची ते ॥१॥ दोहींचें अहिक्य घालीं गडसंदीं । स्थिरावली बुद्धी पायांपाशीं ॥ध्रु.॥ अहाच या केलों देहपरिचारें । तुमचें तें खरें वाटों नये ॥२॥ तुका म्हणे व्हावें लवकरी उदार । मी आहें सादर प्रतिग्रहा ॥३॥