भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागें पुढें पाहें सांभाळूनि दोनी ठाय । चुकावूनि जाय गडी राखे गडियांसि

magen pudhen pahen sambhaluni doni thay | chukavuni jay gadi rakhe gadiyansi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मागें पुढें पाहें सांभाळूनि दोनी ठाय । चुकावूनि जाय गडी राखे गडियांसि ॥१॥ मुरडे दंडा दोहीं तोंडें गडियां सावध करी । भेटतियासंगे तया हाल तुजवरी ॥ध्रु.॥ गडियां गडी वांटुनि देई । ज्याचा सोडी तेचि ठायीं ॥२॥ अगळ्या बळें करील काय । तुज देणें लागे डोय ॥३॥ नवां घरीं पाउला करीं । सांपडे तो तेथें धरीं ॥४॥ जिंकोनि डाव करीं । टाहो सत्ता आणिकांवरी ॥५॥ सांपडोनि डाईं बहु । काळ गुंतलासी ॥६॥ बळिया गडी फळी । फोडी न धरितां त्यांसी ॥७॥ चुकांडी जो खाय मिळोनि अंगीं जाय । गुंतलासी काय तुका म्हणे अझूनी ॥८॥