भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागें नेणपणें घडलें तें क्षमा । आतां देतों सीमा करूनियां

magen nenapanen ghadalen ten kshama | atan deton sima karuniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मागें नेणपणें घडलें तें क्षमा । आतां देतों सीमा करूनियां ॥१॥ परनारीचें जया घडलें गमन । दावीतो वदन जननीरत ॥ध्रु.॥ उपदेशा वरी मन नाहीं हातीं । तो आम्हां पुढती पाहूं नये ॥२॥ तुका म्हणे साक्षी असों द्यावें मन । घातली ते आण पाळावया ॥३॥