भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागें जैसा होता माझे अंगीं भाव । तैसा एक ठाव नाहीं आतां

magen jaisa hota majhe angin bhav | taisa ek thav nahin atan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मागें जैसा होता माझे अंगीं भाव । तैसा एक ठाव नाहीं आतां ॥१॥ ऐसें ग्वही माझें मन मजपाशीं । तुटी मुदलेंसी दिसे पुढें ॥ध्रु.॥ पुढिलांचे मना आणि गुणदोष । पूज्य आपणांस करावया ॥२॥ तुका म्हणे जाली कोंबड्याची परी । पुढें चि उकरी लाभ नेणें ॥३॥