भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागें बहुतां जन्मीं हें चि करित आलों आम्ही । भवतापश्रमी दुःखें पीडिलीं निववूं त्यां

magen bahutan janmin hen chi karit alon amhi | bhavatapashrami duhkhen pidilin nivavun tyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मागें बहुतां जन्मीं हें चि करित आलों आम्ही । भवतापश्रमी दुःखें पीडिलीं निववूं त्यां ॥१॥ गर्जो हरीचे पवाडे मिळों वैष्णव बागडे । पाझर रोकडे काढूं पाषाणामध्यें ॥ध्रु.॥ भाव शुद्ध नामावळी हर्षे नाचों पिटूं टाळी । घालूं पायां तळीं ।कळीकाळ त्याबळें ॥२॥ कामक्रोध बंदीखाणी तुका म्हणे दिले दोन्ही । इंद्रियांचे धणी आम्ही जालों गोसांवी ॥३॥