भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागतियाचे दोनचि कर । अमित भांडार दातियाचें

magatiyache donachi kar | amit bhandar datiyachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मागतियाचे दोनचि कर । अमित भांडार दातियाचें ॥१॥ काय करूं आतां कासयांत भरूं । हा मज विचारु पडियेला ॥ध्रु.॥ एकें सांठवणें प्रेमें वोसंडलीं । जिव्हा हे भागली करितां माप ॥२॥ तुका म्हणे आतां आहे तेथें असो । अंखुनियां बैसों पायांपाशीं ॥३॥