भजनी मालिका
← भजनांकडे परत

मदें मातलें नागवें नाचे । अनुचित वाचे बडबडी

maden matalen nagaven nache | anuchit vache badabadi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मदें मातलें नागवें नाचे । अनुचित वाचे बडबडी ॥१॥ आतां शिकवावा कोणासी विचार । कर्म तें दुस्तर करवी धीट ॥ध्रु.॥ आलें अंगासी तें बिळवंत गाढें । काय वेड्यापुढें धर्मनीत ॥२॥ तुका म्हणे कळों येईल तो भाव । अंगावरील घाव उमटतां ॥३॥