भजनी मालिका
← भजनांकडे परत

मदनमूर्ति तूं डोळ्या आसुमाय जालासी

madanamurti tun dolya asumay jalasi

मदनमूर्ति तूं डोळ्या आसुमाय जालासी । सेखीं कामिनिचेनि पक्षें तीं पुराणें पिशाच करिती रया ॥१॥ गोजिरिया गुण निधाना । बापा गुंतल्यापणाचिया साठी ॥ वेदविदेही विचारितां तेथें । आगम काढिती आटिरया ॥ध्रु०॥ सायुज्यता जालीय मग सादृश्यपण तेथें लोपे । अवयव अळंकार मुरालिया तेथें दृष्टि परमार्थ थोपे रया ॥२॥ तत्त्वपणाचेनि समरसें तेथें पुरोनि उरे तें शेष । बापरखुमादेविवरु विठ्ठलीं गगनीं नक्षत्र पडे नुरेचि तेथें रेख रया ॥३॥