भजनी मालिका
← भजनांकडे परत

लोक फार वाखा अमंगळ जाला । त्याचा त्याग केला पांडुरंगा

lok phar vakha amangal jala | tyacha tyag kela panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लोक फार वाखा अमंगळ जाला । त्याचा त्याग केला पांडुरंगा ॥१॥ विषयां वंचलों मीपणा मुकलों । शरण तुज आलों पांडुरंगा ॥ध्रु.॥ घर दार अवघीं तजिलीं नारायणा । जीवींच्या जीवना पांडुरंगा ॥२॥ तुका म्हणे पडिलों पुंडलिकापाशीं । धांव हृषीकेशी आळिंगीं मज ॥३॥