भजनी मालिका
← भजनांकडे परत

लेउनि अंजन दाविलें निधान

leuni anjan davilen nidhan

लेउनि अंजन दाविलें निधान । देखतांचि मन मावळलें ॥१॥ ऐसिया सुखाचे करुनियां आळें । बीज तें निर्मळ पेरी आतां ॥२॥ ज्ञानाचा हा वाफ़ा भरुनियां कमळीं । सतरावी निराळी तिंबतसे ॥३॥ निवृत्ति प्रसादें पावलों या सुखा । उजळलीया रेखा ज्ञानाचिया ॥४॥