भजनी मालिका
← भजनांकडे परत

लेकुरें नसतील काय घरोघरीं

lekuren nasatil kay gharogharin

लेकुरें नसतील काय घरोघरीं काय न वीये ते माया । परि हे दशा वेगळी न बाईहो । हा न ये त्या आधीं जीव निघों पाहे । आला तरी उरो नेदि कांही । जाय तरी जाय । डोळे तळमळिता ठाये । लांचावला जिऊ । राहेगे बाईये ॥१॥ तमाळनिळें चांदिणें वो वारि वोवराल आपुलीयेस बये । हें मूळदृष्टी पुढें रिघोनिया झाडा घेत आहे । येणें कान्हयें कासाविस केलेंगे माये ॥२॥ नेणो कैसे बाळसें । डौरलें डोळां लासे । माजि महुरजता हे हांसे । भोळिवेचे । देखिलियाचि पुरे । घालुनि दॄष्टीचें भुररें । मग तें ह्रदयीं वावरे । इच्छावसेंगे माये ॥३॥ थुरथुर करितु । शक्ति भोळी वाचालतुं । मुग्दुलें गुणें बोलतुगे माये ॥ असाबतु सावळिया प्रभा डोळसु नभाचा गाभा । कटीं कर ठेऊनियां उभा । हेंचि जाणगे माये ॥४॥ पाहों याची नवलपरी । बरवेपणाची हाउली वरी । दृष्टी करवी झोंबवी । यासि कवण वारी ॥ आम्हीच साहातों अळी । परी हे चुबडी भली । रिघोनिया आड घाली । अगंकांतीगे माये ॥५॥ पहा वो याचा खेळु आमचे नासे । कोपो तरी खदखदां हांसे । जी जी बाळा म्हणों तरी रुसे वो ॥ राहो नेदी सुखें । न राहे निमिष एके । वारा कां गोडी सेविखें । कान्हो दिठीचें माये ॥६॥ आतां येईल म्हणोनि सांपडऊं द्वारें । आडऊं तंव झळाळित दिसताहे उजियेडें । भितरींच्या भितरी लांबा धुमाळु चाचरु । मांडी कामापा़डीं आवारुगे माय ॥७॥ गार्‍हाण्याचें निमिसें । गौळणी उचंबळता हे ब्रह्मरसें । वान वसे चोपसें । कृष्णाचेनि ॥ मालाथुन एक मोहरें । देवपण धाडिलें अनुरे । भावो किं देवों बैसवाल धुरें । पुसे निवृत्तिदासु ॥८॥