भजनी मालिका
← भजनांकडे परत

लेखिलें कवित्व माझे सहज बोल । न लगे चि ओल जिव्हाळ्याची

lekhilen kavitva majhe sahaj bol | na lage chi ol jivhalyachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लेखिलें कवित्व माझे सहज बोल । न लगे चि ओल जिव्हाळ्याची ॥१॥ नये चि उत्तर कांहीं परतोनि । झालों नारायणे न सरतें ॥ध्रु.॥ लाजिरवाणी कां वदली हे वाचा । नव्हेचि ठायींचा मननशीळ ॥२॥ तुका म्हणे फळ नव्हे चि सायासा । पंढरीनिवासा काय झालें ॥३॥