भजनी मालिका
← भजनांकडे परत

लये लये लखोटा । मूळबंदि कासोटा । भावा केलें साहें । आतां माझें पाहें

laye laye lakhota | mulabandi kasota | bhava kelen sahen | atan majhen pahen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लये लये लखोटा । मूळबंदि कासोटा । भावा केलें साहें । आतां माझें पाहें ॥१॥ हातोहातीं गुंतली । जीवपणा मुकली । धीर माझा निका । सांडीं बोल फिका ॥ध्रु.॥ अंगीकारी हरी । नको पडों फेरी । लाज धरीं भांडे । जग झोडी रांडे ॥२॥ बैस भावा पाठीं । ऐक माझ्या गोष्टी । केला सांडीं गोहो । येथें धरीं मोहो ॥३॥ पाठिमोरा डोल । आवरी तें बोल । पांगलीस बाळा । पुढें अवकळा ॥४॥ आतां उभी ठायीं । उभाउभीं पाहीं । नको होऊं डुकरी । पुढें गाढव कुतरी ॥५॥ नामा केलें खरें । आपुलें म्या बरें। तुका म्हणे येरी । पांगविल्या पोरी ॥६॥