भजनी मालिका
← भजनांकडे परत

लय लक्षूनियां जालों म्हणती देव । तो ही नव्हे भाव सत्य जाणा

lay lakshuniyan jalon mhanati dev | to hi navhe bhav satya jana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लय लक्षूनियां जालों म्हणती देव । तो ही नव्हे भाव सत्य जाणा ॥१॥ जालों बहुश्रुत न लगे आतां कांहीं । नको राहूं ते ही निश्चितीनें ॥ध्रु.॥ तपें दान काय मानिसी विश्वास । बीज फळ त्यास आहे पुढें ॥२॥ कर्म आचरण यातीचा स्वगुण । विशेष तो गुण काय तेथें ॥३॥ तुका म्हणे जरी होईल निष्काम । तरि च होय राम देखे डोळां ॥४॥