भजनी मालिका
← भजनांकडे परत

लावूनियां मुद्रा बांधोनियां कंठीं । हिंडे पोटासाठी देशोदेशीं

lavuniyan mudra bandhoniyan kanthin | hinde potasathi deshodeshin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लावूनियां मुद्रा बांधोनियां कंठीं । हिंडे पोटासाठी देशोदेशीं ॥१॥ नेसोनि कोपीन शुभ्रवर्ण जाण । पहाती पक्वान्न क्षेत्रींचें तें ॥ध्रु.॥ तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यापाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥२॥