भजनी मालिका
← भजनांकडे परत

लावूनियां गोठी । चुकवूं आदरिली दिठी । देऊनियां मिठी । पळे महिया माथुले

lavuniyan gothi | chukavun adarili dithi | deuniyan mithi | pale mahiya mathule

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लावूनियां गोठी । चुकवूं आदरिली दिठी । देऊनियां मिठी । पळे महिया माथुले ॥१॥ पुढे तेची करी आड । तिचा लोभ तिसी नाड । उरवी चरफड । हात गोउनी पळावें ॥ध्रु॥ आधीं काकुलती । मोहो घालावापुढती । तोंडी पडे माती । फिरतां मग कैचां तो ॥२॥ तुका म्हणे देवा । यासी रडवी याचा हेवा । भावें कां हे सेवा । सुखे तुम्हा नार्पीती ॥३॥