भजनी मालिका
← भजनांकडे परत

लवविलें तया सवें लवे जाती । अभिमाना हातीं सांपडेना

lavavilen taya saven lave jati | abhimana hatin sampadena

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लवविलें तया सवें लवे जाती । अभिमाना हातीं सांपडेना ॥१॥ भोळिवेचें लेणें विष्णुदासां साजे । तेथें भाव दुजे हारपती ॥ध्रु.॥ अर्चन वंदन नवविधा भक्ती । दया क्षमा शांति ठायीं ॥२॥ तये गांवीं नाहीं दुःखाची वसती । अवघा चि भूतीं नारायण ॥३॥ अव घें चि जालें सोंवळें ब्रम्हांड । विटाळाचें तोंड न देखती ॥४॥ तुका म्हणे गाजे वैकुंठीं सोहळा । याही भूमंडळामाजी कीर्ती ॥५॥