भजनी मालिका
← भजनांकडे परत

लटिकी ग्वाही सभेआंत । देतां पतित आगळा

latiki gvahi sabheant | detan patit agala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लटिकी ग्वाही सभेआंत । देतां पतित आगळा ॥१॥ कुंभपाकीं वस्ती करूं । होय धुरु कुळेसी ॥ध्रु.॥ रजस्वला रुधिर स्रवे । तें चि घ्यावें तृषेसी ॥२॥ तुका म्हणे जन्मा आला । काळ झाला कुळासी ॥३॥