भजनी मालिका
← भजनांकडे परत

लटिकेची साच दाविलें अचळ । पिडीतसे काळ किती म्हणू

latikechi sach davilen achal | piditase kal kiti mhanu

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लटिकेची साच दाविलें अचळ । पिडीतसे काळ किती म्हणू ॥१॥ सत्य तूं सत्य तूं सत्य तूं विठ्ठला । कां गा हा दाविला जगदाकार ॥ध्रु.॥ सांभाळी सांभाळी आपुलीं हे माया । आम्हांसी कां भयभीत केले ॥२॥ रूप नाही त्यासी ठेविले नाम । लटिकाची भ्रम वाढविला ॥३॥ तुका म्हणे कां गा झालासी चतुर । होतासी निसूर निर्विकार ॥४॥