भजनी मालिका
← भजनांकडे परत

लटिका तो प्रपंच एक हरी साचा । हरीविण आहाच सर्व इंद्रियें

latika to prapanch ek hari sacha | harivin ahach sarva indriyen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लटिका तो प्रपंच एक हरी साचा । हरीविण आहाच सर्व इंद्रियें ॥१॥ लटिकें तें मौन्य भ्रमाचें स्वप्न । हरीविण ध्यान नश्वर आहे ॥ध्रु.॥ लटिकिया वित्पत्ति हरीविण करिती । हरी नाहीं चित्तीं तो शव जाणा ॥२॥ तुका म्हणे हरी हें धरिसी निर्धारीं । तरीं तूं झडकरी जासी वैकुंठासी ॥३॥