भजनी मालिका
← भजनांकडे परत

लंकेमाजी घरें किती तीं आइका । सांगतसें संख्या जैसीतैसी

lankemaji gharen kiti tin aika | sangatasen sankhya jaisitaisi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लंकेमाजी घरें किती तीं आइका । सांगतसें संख्या जैसीतैसी ॥१॥ पांच लक्ष घरें पाषाणांचीं जेथें । सात लक्ष तेथें विटेबंदी ॥ध्रु.॥ कोटि घरें जेथें कांशा आणि तांब्याचीं । शुद्ध कांचनाचीं सप्त कोटी ॥२॥ तुका म्हणे ज्याची संपदा एवढी । सांगातें कवडी गेली नाहीं ॥३॥