भजनी मालिका
← भजनांकडे परत

लांब धांवे पाय चोरी । भरोवरी जनाच्या

lamb dhanve pay chori | bharovari janachya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लांब धांवे पाय चोरी । भरोवरी जनाच्या ॥१॥ आतां कैसें होय याचें । सिजतां काचें राहिलें ॥ध्रु.॥ खाय ओकी वेळोवेळां । कैसी कळा राहेल ॥२॥ तुका म्हणे भावहीण । त्याचा सीण पाचावा ॥३॥