भजनी मालिका
← भजनांकडे परत

लक्ष्मीवल्लभा । दिनानाथा पद्मनाभा

lakshmivallabha | dinanatha padmanabha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लक्ष्मीवल्लभा । दिनानाथा पद्मनाभा ॥१॥ सुख वसे तुझे पायीं । मज ठेवीं ते चि ठायीं ॥ध्रु.॥ माझी अल्प हे वासना। तूं तो उदाराचा राणा ॥२॥ तुका म्हणे भोगें । पीडा केली धांव वेगें ॥३॥