भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाजोनियां काळें राहिलें लिखित । नेदितां ही चित्त समाधान

lajoniyan kalen rahilen likhit | neditan hi chitta samadhan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लाजोनियां काळें राहिलें लिखित । नेदितां ही चित्त समाधान ॥१॥ कैसें सुख वाटे वचनाचे तुटी । प्रीतिविण भेटी रुचि नेदी ॥ध्रु.॥ एकाचिये भेटी एकाचा कोंपर । मायेचा पदर कळों येतो ॥२॥ होत्या आपल्या त्या वेचूनियां शक्ती । पुढें झालों युक्तिकळाहीन ॥३॥ तुका म्हणे तुम्ही समर्थ जी देवा । दुर्बळाची सेवा कोठें पावे ॥४॥