भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा

lahanapan de ga deva | mungi sakharecha rava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लाहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥ ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥ध्रु.॥ ज्याचे अंगीं मोठेपण । तया यातना कठीण ॥२॥ तुका म्हणे जाण । व्हावें लाहनाहुनि लाहन ॥३॥