भजनी मालिका
← भजनांकडे परत

लागों नेदीं बोल पायां तुझ्या हरी । जीव जावो परि न करीं आण

lagon nedin bol payan tujhya hari | jiv javo pari na karin an

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लागों नेदीं बोल पायां तुझ्या हरी । जीव जावो परि न करीं आण ॥१॥ परनारी मज रखुमाईसमान । वमनाहूनि धन नीच मानीं ॥२॥ तुका म्हणे याची लाज असे कोणा । सहाकारी दीना ज्याची तया ॥३॥