भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाघवी सूत्रधारी दोरी नाचवी कुसरी । उपजवी पाळूनि संहारी नानापरिचीं लाघवें

laghavi sutradhari dori nachavi kusari | upajavi paluni sanhari nanaparichin laghaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लाघवी सूत्रधारी दोरी नाचवी कुसरी । उपजवी पाळूनि संहारी नानापरिचीं लाघवें ॥१॥ पुरोनि पंढरिये उरलें भक्तीसुखें लांचावलें । उभें चि राहिलें कर कटीं न बैसे ॥ध्रु.॥ बहु काळें ना सावळें बहु कठिण ना कोंवळें । गुणत्रया वेगळें बहुबळें आथीलें ॥२॥ असोनि नसे सकळांमधीं मना अगोचर बुद्धी । स्वामी माझा कृपानिधि तुका म्हणे श्रीविठ्ठल ॥३॥