भजनी मालिका
← भजनांकडे परत

लागे तुझी सोय करी ऐसे कांहीं । माझे विठाबाई माऊलिये

lage tujhi soy kari aise kanhin | majhe vithabai mauliye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लागे तुझी सोय करी ऐसे कांहीं । माझे विठाबाई माऊलिये ॥१॥ पतितपावन म्हणविसी जरी । अव्हेर न करी तरी माझा ॥ध्रु॥ नाहीं तरी ब्रीद टाकी सोडूनियां । न धरिसी माया जरी माझी ॥२॥ बोलियेला बोल करावा साचार । तरी लोक बरें म्हणतील ॥३॥ करावा संसार लोक लाजे भेणें । वचनासी उणें येऊं नेदी ॥४॥ तुम्हां आम्हां तसै नाही म्हणे तुका । होशील तूं सखा जीवलग ॥५॥