भजनी मालिका
← भजनांकडे परत

लागलिया मुख स्तनां । घाली पान्हा माउली

lagaliya mukh stanan | ghali panha mauli

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लागलिया मुख स्तनां । घाली पान्हा माउली ॥१॥ उभयतां आवडी लाडें । कोडें कोड पुरतसे ॥ध्रु.॥ मेळवितां अंगें अंग । प्रेमें रंग वाढतो ॥२॥ तुका म्हणे जड भारी । अवघें शिरीं जननीचे ॥३॥