भजनी मालिका
← भजनांकडे परत

लागलें भरतें । ब्रह्मानंदाचें वरतें

lagalen bharaten | brahmanandachen varaten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लागलें भरतें । ब्रह्मानंदाचें वरतें ॥१॥ झाला हरीनामाचा तारा । सीड लागलें फरारा ॥ध्रु.॥ बैसोनि सकळ । बाळ चालिले गोपाळ ॥२॥ तुका म्हणे वाट । बरवी सांपडली नीट ॥३॥