भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्ण गोकुळीं जन्मला । दुष्टां चळकांप सुटला

krushna gokulin janmala | dushtan chalakamp sutala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कृष्ण गोकुळीं जन्मला । दुष्टां चळकांप सुटला ॥१॥ होतां कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ॥ध्रु.॥ सदा नाम वाचें । गाती प्रेमेआनंदें नाचती ॥२॥ तुका म्हणे हरती दोष । आनंदानें करिती घोष ॥३॥