भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्ण ध्यातां चित्तीं कृष्ण गातां गीतीं । ते ही कृष्ण होती कृष्णध्यानें

krushna dhyatan chittin krushna gatan gitin | te hi krushna hoti krushnadhyanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कृष्ण ध्यातां चित्तीं कृष्ण गातां गीतीं । ते ही कृष्ण होती कृष्णध्यानें ॥१॥ आसनीं शयनीं भोजनीं जेवितां । म्हणारे भोगिता नारायण ॥ध्रु.॥ ओविया दळणीं गावा नारायण । कांडितां कांडण करितां काम ॥२॥ नर नारी याति हो कोणी भलतीं । भावें एका प्रीती नारायणा ॥३॥ तुका म्हणे एका भावें भजा हरी । कांति ते दुसरी रूप एक ॥४॥