भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपेचें उत्तर देवाचा प्रसाद । आनंदीं आनंद वाढवावा

krupechen uttar devacha prasad | anandin anand vadhavava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कृपेचें उत्तर देवाचा प्रसाद । आनंदीं आनंद वाढवावा ॥१॥ बहुतांच्या भाग्यें लागलें जाहाज । येथें आतां काज लवलाहो ॥ध्रु.॥ अलभ्य तें आलें दारावरी फुका । येथें आता चुका न पाहिजे ॥२॥ तुका म्हणे जिव्हा श्रवणाच्या द्वारें । माप भरा वरें सिगेवरी ॥३॥