भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपेचे सागर हे साधुजन । तिंहीं कृपादान केलें मज

krupeche sagar he sadhujan | tinhin krupadan kelen maj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कृपेचे सागर हे साधुजन । तिंहीं कृपादान केलें मज ॥१॥ बोबडे वाणीचा केला अंगीकार । तेणें माझा स्थिर केला जीव ॥ध्रु.॥ तेणें सुखें मन स्थिर झालें ठायीं । संतीं दिला पायीं ठाव मज ॥२॥ नाभी नाभी ऐसें बोलिलों वचन । तें माझें कल्याण सर्वस्व ही ॥३॥ तुका म्हणे झालों आनंदेनिर्भर । नाम निरंतर घोष करूं ॥४॥