भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपावंतें हाक दिली सकळिकां । माजिया रे नका राहों कोणी

krupavanten hak dili sakalikan | majiya re naka rahon koni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कृपावंतें हाक दिली सकळिकां । माजिया रे नका राहों कोणी ॥१॥ निघाले या भेणे पाउसाच्या जन । देखे गोवर्धन उचलिला ॥२॥ लाविले गोपाळ फेरीं चहूंकडे । हांसे फुंदे रडे कोणी धाकें ॥३॥ धाकें हीं सकळ निघालीं भीतरी । उचलिला गिरी तयाखालीं ॥४॥ तयाखालीं गाईं वत्सें आलीं लोक । पक्षी सकळिक जीवजाति ॥५॥ जिहीं म्हणविलें हरीचे अंकित । जातीचे ते होत कोणी नरी ॥६॥ जाति कुळ नाहीं तयासि प्रमाण । अनन्या अनन्य तुका म्हणे ॥७॥